ऑनलाईन टीम / मुंबई :
मागील काही दिवसांपासून नाराज असलेले भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष सोडला असून शुक्रवारी दुपारी दोन वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते.
ते म्हणाले, 23 ऑक्टोबर रोजी एकनाथ खडसे दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे बळ वाढेल. महाराष्ट्राचे जाण असलेले नेते राष्ट्रवादीमध्ये येत आहेत. त्यांचे स्वागत आहे. भाजपात झालेल्या अन्यायामुळे ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येताना त्यांनी कोणतीही अट ठेवली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्त्वात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
एकनाथ खडसेंच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कौतुक केले आहे.