प्रतिनिधी/ सातारा
काही काळ पत्रकारिता केलेले व पुन्हा व्यवसायात रमलेले सातारचे एकपात्री प्रयोगातून करणमूक करणारे अभय देवरे यांचे अपल्शा आजाराने निधन झाले.त्यांच्या निधनाने सातारच्या रंगकर्मीमध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सातारा येथील गुरुवार पेठेत अभय देवरे यांचे हार्डवेअरचे दुकान आहे.ते व्यवसाय सांभाळून लोकांची करमणूक एकपात्री प्रयोगातून करत असत.त्यांनी काही काळ पत्रकारिता केली होती.नेहमी हसतमुख असणारे अभय देवरे गेल्या काही दिवसांपासून दुर्दधर आजाराने त्रस्त होते.त्यातच त्यांना देवाज्ञा झाली.त्यांनी एकपात्री प्रयोग परदेशात केले होते.लॉक डाऊनच्या काळात फेसबुकवर येऊन लोकांची करमणूक केली होती.त्यांचा गंम्मत गप्पा हा अतिशय गाजलेला कार्यक्रम होता.ते सूत्रसंचालन छान करायचे.त्यांच्या प्रश्चात आई, पत्नी, दोन मुले,भाऊ, बहीण असा परिवार आहे.अरुण गोडबोले, तुषार भद्रे, वनराज कुमकर, बाळकृष्ण शिंदे, अभिजित वाईकर, माधुरी पवार, पंकज काळे आदी सातायातल्या रंगकर्मीनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.