शेकडो मॅचिंग ड्रेसेसनी भरलेले कपाट
स्वतःच्या बाळाने सुंदर कपडे घालावेत अशी प्रत्येक आईची इच्छा आहे. ब्रिटनच्या विगेनमध्ये राहणाऱया लॉरा हॅम्पसन यांना मात्र वेगळाच ध्यास आहे. त्या स्वतःच्या दीड वर्षीय मुलीला स्वतःसारखेच कपडे घालतात, जेणेकरून दोघीही एकसारख्या दिसतील.
फॅशनेबल कपडय़ांची शौकीन 39 वर्षीय लॉरा हॅम्पसन स्वतःची मुलगी डार्लेनीला अत्यंत स्वतःप्रमाणे ड्रेसेस घालतात. त्यांच्या दैनंदिन कपडय़ांची रंगसंगती देखील एकसारखीच असते आणि कपडय़ांची स्टाइलही तशीच असते.
डार्लेनीचे वय 19 महिने असून ती आतापर्यंत स्वतःच्या आईने निवडलेले मॅचिंग आउटफिट्सच घालत आहे. पेशाने व्हिज्युअल मर्चेंडाइजर असलेल्या लॉरा यांनी स्वतःचा फॅशन सेन्सच मॅचिंग आउटफिट्स परिधान करण्यासाठी प्रेरित करत असल्याचे म्हटले आहे. मायलेकीकडे एकसारखे 150 आउटफिट्सची रेंज असून ते बदलून-बदलून ते घालत असतात. लॉरा आठवडय़ात दोन दिवसांच्या सुटीत स्वतःच्या मुलीसोबत मॅचिंगचे कपडे घालते. त्यांच्या कपडय़ांमध्ये बोल्ड प्रिंट्स असतात, जे लॉराला अत्यंत पसंत आहे.
मायलेकीच्या कपाटात हिवाळा तसेच उन्हाळय़ासाठीचे वेगवेगळे कपडे आहेत. लॉरा परिधान करणाऱया प्रिंट आणि रंगाच्याच्या कपडय़ांमध्येच डार्लेनी दिसून येते. स्वतःसाठी आणि मुलीसाठी चॅरिटी शॉप्समधून शॉपिंग करणे पसंत करते. तेथे अनके प्रकारचे सेल आणि कपडय़ांमध्ये चांगले वैविध्य मिळते. रंगसंगतीसाठी अनकेदा कपडय़ांना डाय करण्यासही मागेपुढे पाहत नसल्याचे लॉरा सांगतात.
आईमुलीच्या स्टाइलिंगचे चाहते देखील कमी नाहीत. इन्स्टाग्रामवरील अकौंटवर लॉरा आणि त्यांच्या मुलीचे अत्यंत क्यूट मॅचिंग आउटफिट्स दिसून येतात. जोपर्यंत मुलगी नकार देण्याएवढी मोठी होत नाही तोवर मॅचिंग आउटफिट्स घालणे सुरूच ठेवणार असल्याचे त्यांचे सांगणे आहे.