आयपीएल स्पर्धेत सोमवारी या हंगामातील 19 व्या लढतीत एकही चेंडू खेळण्यापूर्वी एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाणेफेकीला उतरला, त्याचवेळी तो जागतिक स्तरावरील कोणत्याही एकाच संघातर्फे सर्वाधिक टी-20 सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरतर्फे विराट कोहलीने आता 197 सामने खेळले असून या निकषावर त्याने कौंटी क्रिकेट क्लब सॉमरसेटच्या जेम्स हिलड्रथला मागे टाकले आहे.
विराट कोहलीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध लढतीपूर्वी 5926 धावांचे योगदान दिले होते. नंतर त्याने दिल्लीविरुद्ध आणखी एक बहारदार खेळी साकारताना प्रतिस्पर्ध्यांना चांगलेच जेरीस आणले. सॉमरसेटच्या जेम्स हिलड्रेथने 196 सामन्यात 3694 धावा केल्या असून तो दुसऱया स्थानी आहे. नॉटिंगहमशायरचा समित पटेल तिसऱया स्थानी असून त्याने 191 सामन्यात 3601 धावा केल्या आहेत.
या यादीत चेन्नईचा महेंद्रसिंग धोनी चौथ्या स्थानी असून त्याने 189 सामन्यात 4398 धावांचे योगदान दिले आहे. चेन्नईचाच सुरेश रैना पाचव्या स्थानी आहे. त्याने 188 सामने खेळत 5369 धावा केल्या आहेत. यंदा वैयक्तिक कारणास्तव त्याने हंगामातून माघार घेतली आहे.