कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत मंगळवारी दोन सत्रात मॉकटेस्ट (सराव परीक्षे)चे आयोजन करण्यात आले होते. परंतू दोन्ही सत्राचे जवळपास 1 लाख 20 हजार विद्यार्थ्यी एकाचवेळी लॉगईन केल्यामुळे दीर्घ काळ संकेतस्थळ व्यस्त राहिले. त्यामुळे मॉकटेस्ट देण्यासाठी विद्यार्थ्यांना अनंद अडचणींचा समना करावा लागला. विद्यापीठ प्रशासनाला याची माहिती कळताच विद्यार्थ्यांचे दोन गट करून दोन सत्रात विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली. परंतू यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये बराच वेळ गोंधळाचे वातावरण होते. यामध्ये विद्यापीठ अंतर्गत सर्व महाविद्यालये व दूरशिक्षणच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे