एकही सुटी न घेणारा कर्मचारी : निवृत्त होण्याची इच्छा नाही
सर्वसाधारणपणे माणूस वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त होतो, किंवा मधल्या काळा त्याने अनेक नोकऱया बदललेल्या असतात. परंतु ब्रिटनमधील एक व्यक्ती मागील 70 वर्षांपासून एकाच कंपनीत काम करत आहे. या व्यक्तीने 70 वर्षांमध्ये एकदाही सुटी घेतलेली नाही. लोक त्याला देशाचा ‘सर्वात समर्पित कर्मचारी’ संबोधित आहेत.
ब्रिटनच्या या सर्वात समर्पित कर्मचाऱयाचे नाव ब्रायन चोर्ले आहे. ब्रायन यांचे वय 83 वर्षे आहे. 1953 मध्ये त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी एका पादत्राणांच्या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून आजपर्यंत ते याच कंपनीत काम करत आहेत.
शालेय दिवसांमध्ये कुटुंबासाठी अतिरिक्त पैसे कमविण्याच्या उद्देशाने सोमरसेट येथील सीअँडजे क्लार्क फॅक्ट्रीत नोकरी सुरू केली होती. महायुद्धानंतर आम्ही अत्यंत गरीब झालो होतो. माझे वडिल सैन्यात होते. फॅक्ट्रीत आठवडय़ाला 45 तास काम केल्यावर दोन पाउंड (200 रुपये) कमावत होते, यातील एक पाउंड स्वतःच्या आईला दिला होता असे त्यांनी सांगितले आहे.
70 वर्षांमध्ये फॅक्ट्री एका शॉपिंग सेंटरमध्ये रुपांतरित झाली, परंतु ब्रायन चोर्ले बदलले नाहीत. फॅक्ट्रीतून शॉपिंग सेंटरमध्ये शिफ्ट होत त्यांनी प्रशिक्षण घेत तेथेच काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी एकाच कार्यस्थळावर सुमारे 70 वर्षे पूर्ण केली आहेत. ते देखील कुठलीच सुटी न घेता हा कालावधी पूर्ण केला आहे. लॉकडाउनमध्ये काही काळासाठी काम बंद झाल्यावर ते अत्यंत त्रस्त झाले होते.
83 वर्षीय ब्रायन यांची अद्याप निवृत्त होण्याची कुठलीच योजना आहे. 95 वर्षीय डेव्हिडन ऍटनबरो माझे आदर्श आहेत असे ते सांगतात. आरोग्य तपासणी केल्यावर मी अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे कळले असे त्यांचे म्हणणे आहे.