प्रतिनिधी / बेंगळूर
आर्थिक संकटामुळे एकाच कुटुंबातील चार जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना चामराजनगर जिल्हय़ातील एच. मूकहळ्ळी येथे बुधवारी घडली आहे. महादेवस्वामी (वय 55), पत्नी मंगळम्मा (वय 40), गीता (वय 16) आणि श्रुती (वय 11) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. कोरोनाची लागण झाल्यामुळे 9 मे पासून महादेवस्वामी यांना कामावर जाता आले नाही. शिवाय दूध डेअरीत जमा करता आले नाही. शिवाय कोरोनामुक्त झाल्यानंतरही आजुबाजूच्या लोकांनी त्यांच्यापासून दूर राहणे पसंत केले. त्यामुळे मानसिकदृष्टय़ा खिन्न झालेल्या महादेवस्वामी यांनी पत्नी आणि दोन मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या केली.