एमजी मोटरची नवी इलेक्ट्रिक कार
वृत्तसंस्था/ चेन्नई
एमजी मोटर इंडिया यांनी आपली नवी एमजी झेडएस इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची घोषणा केली आहे. सदरची नवी इलेक्ट्रिक कार ही एका चार्जवर 480 किलोमीटर इतके मायलेज देऊ शकणार आहे.
एमजी झेडएस नव्या इलेक्ट्रिक वाहनाला पहिल्यांदा 2020 मध्ये भारतामध्ये सादर करण्यात आले होते. त्यानंतर 2021 मध्ये सुरुवातीला सुधारीत आवृत्ती ठराविक बदल करून सादर करण्यात आली होती. आता 2022 मध्ये कंपनी याचीच एक सुधारित आवृत्ती कंपनी लॉन्च करत आहे. सौंदर्यवर्धक बदलांसह काही आकर्षक वैशिष्ठय़े या गाडीत असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या गाडीमध्ये 44.5 केडब्ल्यूएचची लिथियम आयन बॅटरी असून एकदा चार्ज केल्यानंतर सदरची गाडी 480 किलोमीटरचे अंतर पार करू शकणार आहे.