प्रतिनिधी/ बेंगळूर
चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपण्याच्या मार्गावर असून पाचव्या लॉकडाऊनमध्ये आणखी काही क्षेत्रांना सूट मिळण्याची चिन्हे आहेत. लॉकडाऊन शिथिल होत असतानाच राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. शुक्रवारी राज्यात तब्बल 248 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे गुलबर्गा, यादगिर आणि रायचूर जिल्हय़ांमध्येच 121 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर राज्यभरात मागील 24 तासांत 60 जण डिस्चार्ज झाले आहेत.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंत परप्रांतात गेलेले हजारो कामगार कर्नाटकात परतले असून त्यांच्यामध्ये अनेकजण कोरोनाबाधित आढळून येत आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून प्रामुख्याने उडुपी, गुलबर्गा, यादगिर, बिदर, मंडय़ा रायचूर जिल्हय़ांना अधिक फटका बसला आहे. बेंगळूरमधील रुग्णांचा आकडा 303 वर पोहोचला आहे. तर मंडय़ा, गुलबर्गा आणि यादगिर जिल्हय़ांनी कोरोनाचा 200 आकडा पार केला आहे. मंगळूर आणि म्हैसूर जिल्हे शतकाच्या उंबरठय़ावर आहेत. शुक्रवारी एकाच दिवशी 248 नवे रुग्ण आढळून आले असून राज्यात आतापर्यत एकाच दिवशी इतक्या प्रमाणात रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. मागील आठवडय़ात शनिवारी 216 रुग्ण आढळले होते.
जिल्हानिहाय नवे रुग्ण
रायचूर जिल्हय़ात 62, गुलबर्ग्यात 61, यादगिर 60, उडुपी 15, बेंगळूर शहर 12, बळ्ळारी 9, चिक्कबळ्ळापूर 5, विजापूर, दावणगेरे व हासन जिल्हय़ांमध्ये प्रत्येकी 4, तुमकूर, मंडय़ा, चिक्कमंगळूर आणि म्हैसुरात प्रत्येकी 2 तसेच बेंगळूर ग्रामीण, शिमोगा, चित्रदुर्ग, धारवाड जिल्हय़ात प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळून आला आहे.
राज्यात 2,718 रुग्णांपैकी आतापर्यंत 894 जण संसर्गमुक्त झाले आहेत. तर 1837 जणांवर विविध इस्पितळांमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच 48 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दोघा कोरोनाबाधितांनी आत्महत्या केली आहे. राज्यभरात 2,64,489 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 2,58,130 जणांच्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 25,860 जण विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
चिक्कबळ्ळापूरमधील महिलेचा बळी
24 ते रोजी वाहन अपघातात गंभीर जखमी झालेली चिक्कबळ्ळापूर येथील 50 वर्षीय महिला खासगी इस्पितळात दाखल झाली होती. गुरुवार दि. 28 मे रोजी मूत्रपिंडडाला दुखापत आणि न्यूमोनियाची लक्षणे दिसून आल्याने तिला बेंगळूरमधील इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी तिच्या स्वॅबचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
एकूण…
आतापर्यंतची रुग्णसंख्या 2781
बरे झालेले रुग्ण 894
उपचारातील एकूण रुग्ण 1837
व्हेंटिलेटरवरील रुग्ण 15
संसर्गबाधितांचा मृत्यू 48
आत्महत्या केलेले रुग्ण 2
एकूण स्वॅब तपासणी 2,64,489
टॉप 10 कोरोनाग्रस्त जिल्हे
1. बेंगळूर शहर 303
2. मंडय़ा 257
3. गुलबर्गा 251
4. यादगिर 223
5. उडुपी 164
6. दावणगेरे 146
7. हासन 144
8. बेळगाव 139
9. चिक्कबळ्ळापूर 136
10. बिदर 120
रुग्णसंख्येचा आलेख…
23 मे शनिवार ………… 216
24 मे रविवार ………… 130
25 मे सोमवार ………… 93
26 मे मंगळवार ………… 101
27 मे बुधवार …………. 135
28 मे गुरुवार …………. 115
29 मे शुक्रवार ………….. 248