कुर्डुवाडी / प्रतिनिधी
माढा तालुक्यातील कुर्डू येथील दोन सख्या भावांचा थोड्या वेळाच्या फरकाने एकाच दिवशी मृत्यू झाला. त्यानंतर दोघा भावांना एकाच चितेवर अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. संतोष नारायण रंदवे (वय ४३), विवेक नारायण रंदवे (वय ४०) अशी या भावंडाची नावे आहेत. त्यांच्या पश्चात दोघांच्या पत्नी, दोघांनाही एक मुलगा एक मुलगी, आई व एक भाऊ असा परिवार आहे.
संतोष हा इलेक्ट्रिकल इंजिनिअर तर विवेक हा फार्मासिस्ट होता.२००१ साली वडिलांच्या अपघाती निधनानंतर आई हिरकणी व संतोष यांनी महेश याला शिक्षक तर विवेक याला फार्मासिस्टचे शिक्षण पूर्ण करुन गावात मेडिकल चे दुकान टाकून दिले व महेशला शासकीय नोकरी लागली. या कुटुंबाने कष्ट आणि जिद्दीच्या जोरावरच व्यवसायामध्ये नाव लौकीक मिळवला होता. यातील संतोष नारायण रंदवे व विवेक नारायण रंदवे या दोन भावांचा वेगवेगळ्या दवाखान्यात उपचार घेत असताना दि.४ रोजी रात्री ११ च्या सुमारास सुमारे अर्ध्या तासाच्या अंतराने एकाच दिवशी मृत्यू झाला. या दोघा भावंडांना एकाच चितेवर अग्नि देण्याची दुर्दैवी वेळ या कुटुंबावर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ही बातमी कुर्डू गावात पसरताच गावावर शोककळा पसरली.