- बाधितांपेक्षा बरे होणारे रुग्ण जास्त
- जिल्हय़ात आणखी दहा पॉझिटिव्ह
- तळेरे येथील 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
- 586 रुग्ण कोरोना मुक्त, 454 सक्रिय
- एकूण रुग्णसंख्या 1059
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात गुरुवारी दहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून तळेरे येथील 75 वषीय एका वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एकाच दिवशी 31 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवारी बाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण जास्त असल्याची नोंद झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिल्हय़ात गुरुवारी नव्याने दहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामध्ये कणकवली तालुक्मयातील कणकवली शहर दोन, नागवे, ओझरम, तळरे प्रत्येकी एक, सावंतवाडी तालुक्मयातील आकेरी एक आणि सावंतवाडी शहर दोन, दोडामार्ग तालुक्मयातील आंबेली दोन असे दहा नवीन रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या 1 हजार 59 झाली आहे.
31 रुग्णांना एकाच दिवशी डिस्चार्ज
गेल्या काही दिवसापासून जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णसंख्या वाढत असताना गुरुवारी मात्र बरे होणाऱया रुग्णांची संख्या अधिक होती. त्यामुळे गुरुवारचा दिवस दिलासा देणारा ठरला. गुरुवारी बरे झालेल्या 31 रुग्णांना एकाच दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत एकूण 586 रुग्ण बरे होऊन कोरोना मुक्त झाले आहेत.
आणखी एका रुग्णाचा मृत्यू
जिल्हय़ात आणखी एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कणकवली तालुक्मयातील तळेरे येथील 75 वषीय वृद्धाला 25 ऑगस्टला उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर 26 ऑगस्टला त्याचा मृत्यू झाला आहे. जिल्हय़ात आता कोरोनामुळे बळी जाणाऱया रुग्णांची संख्या 19 झाली आहे. तर एकूण रुग्णांपैकी 586 रुग्ण बरे झाल्याने सद्यस्थितीत 454 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली आहे.
कंटेनमेंट झोन
कुडाळ तालुक्मयातील रानबांबुळी, परबवाडी येथील घर क्र. 837 हा परिसर, ओरोस येथील जि.प. वसाहत टायिप 3/10/2, रेवतळे, मालवण येथिल घर क्र. 2696 येथील रुम नं. 1 हा परिसर व मालवण तालुक्मयातील देऊळवाडा, मालवण येथिल घर क्र. 2970 हा परिसर, भरड, मालवण येथील घर क्र. 2593 चा परिसर, देऊळवाडा-मराळवाडा, मालवण येथील घर क्र. 2035 या परिसरात, बांगीवाडा, मालवण येथील घर क्र. 2514 (ब) या परिसरात कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 6 सप्टेंबरला रात्री 12 पर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा येथील घर क्र. ई-287 सी, नवसरणी जवळचा चहुबाजूचा परिसर, वैश्यवाडा येथील म्युन्सिपल घर क्र. 371, क, व घरासभोवतालची जागा (अंदाजे 2 मीटर) चा परिसर, सबनीसवाडा येथील म्युन्सिपल घर क्र. डी-254 व चहूबाजूचा (अंदाजे 368 चौ. मीटर) परिसर हा 8 सप्टेंबरला रात्री 12 पर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
खासकीलवाडा मेनरोड सावंतवाडी येथील सदनिका वॉर्ड ई-अथर्व अपार्टमेंट, पहिला मजला, नं. बी. 3 चा चहूबाजूचा परिसर 7 सप्टेंबरला रात्री 12 पर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे, अशी माहिती संबंधित क्षेत्रातील उपविभागीय अधिकाऱयांनी दिली.
दरम्यान, या कंटेनमेंट झोनमध्ये दिलेल्या कालावधीत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रात नागरिकांना येणे-जाणे व सर्व
प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाहीत. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱयाविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 12611
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 1059
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 11217
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 335
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 454
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 19
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 586
अलगीकरणातील एकूण व्यक्ती 12621
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 4240
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 203549
सद्यस्थितीत सक्रिय कंटेनमेंट झोन 169