मालवण/प्रतिनिधी-
पंचायत समिती मालवण व एकात्मिक बाल विकास योजना विभागा अंतर्गत जागतिक महिला दिन कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय सभागृह येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रम, किशोरवयीन मुलींचा मेळावा, तज्ञांचे मार्गदर्शन, विशेष प्राविण्य मिळवलेल्या महीला व मुलींचा पुरस्कार वितरण, कळसूत्री बाहुल्यांचा खेळ अन संदेश अश्या विविधरंगी आदर्शवत उपक्रमानी महिला दिन साजरा करण्यात आला.सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, तहसीलदार अजय पाटणे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कौमुदी रसाळ-पराडकर, सरपंच प्रतिमा भोजने, राधा दिघे मॅडम, ऍड. अमृता मोंडकर, पस सदस्य मनीषा वराडकर यासह पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.
कळसूत्री बाहुली खेळ ठरला विशेष आकर्षणकार्यक्रमाच्या निमित्ताने पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या सहकाऱ्यांनी चेतन गंगावणे यांच्या वतीने महिला दिन अनुषंगाने सादर केलेल्या कळसूत्री बाहुल्यांच्या खेळाचे सर्वांनी कौतुक केले. कळसूत्री बाहुल्यांचा खेळ कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला.