प्रतिनिधी / पंढरपूर
एकादशीनिमित्त पंढरपूर येथे परजिल्ह्यतील विनापरवाना तब्बल 16 वारकरी फिरताना आढळून आले आहेत. या सर्व सोळा विठ्ठलभक्तांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहोत.
याबाबत अधिक माहिती अशी की , मंगळवार हा एकादशीचा दिवस आहे. त्यामुळे दर महिन्याची एकादशी वारी करणारे अनेक विठ्ठल भक्त महाराष्ट्रात आहेत. कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यात फारसे वारकरी तथा विठूभक्त पंढरीत आले नाहीत. मात्र लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील झाल्यावर आज तब्बल 16 विनापरवाना विठ्ठलभक्त पंढरीत वावरताना दिसून आले. या सर्व विठ्ठल भक्तांना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यांची सध्या वैद्यकीय तपासणी होऊन त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याचे नियोजन प्रशासनाकडून होत आहे.
पंढरपुरात सापडलेल्या सोळा विठ्ठलभक्त हे नांदेड , सातारा , सांगली , लातूर , उस्मानाबाद , सोलापूर येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.