तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडी अभिनेत्री
बॉलिवूडमध्ये स्वतःच्या घायाळ अदांनी चर्चेत असणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. उर्वशी लवकरच दक्षिणेच्या बिग बजेट चित्रपटात मायक्रोबायोलॉजिस्ट आणि एका आयआयटीयनच्या भूमिकेत दिसून येणार आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
उर्वशी अलिकडेच मनालीमऋये दिग्गज अभिनेता सरवनन याच्यासोबत चित्रिकरण करताना दिसून आली होती. उर्वशीने या मेगाबजेट चित्रपटासाठी 10 कोटी रुपये आकारले आहेत. दीपिका पदूकोन आणि प्रियांका चोप्रानंतर उर्वशी सर्वात महागडी अभिनेत्री ठरली आहे. तर तमिळसोबत उर्वशी ‘ब्लॅक रोज’ या चित्रपटाद्वारे तेलगूतही पदार्पण करणार आहे.
उर्वशी सध्या स्वतःच्या आगामी चित्रपटांच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. इन्स्पेक्टर अविनाश ही वेबसीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. याचबरोबर इजिप्तिशियन अभिनेता आणि गायक मोहम्मद रमदानसोबत उर्वशी एका म्युझिक अल्बमध्ये दिसून येणार आहे.