देशात आतापर्यंत एका दिवसात सर्वाधिक कोरोनामुक्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात मागील चौवीस तासत 10 हजारांहून अधिक रूग्ण बरे झाले. आतापर्यंतचा एका दिवसात रूग्ण बरे होण्याचा हा सर्वाधिक संख्या ठरली आहे. यापूर्वी 13 जून रोजी 8 हजार 92 जणांना डिस्चार्ज देण्यात आला होता. दरम्यान, मागील 24 तासांमध्ये 10 हजार 667 नवे रूग्ण आढळले तर 380 जणांचा मृत्यू झाला. 1 लाख 53 हजार 178 रूग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 1 लाख 80 हजार 13 जण पूर्ण बरे झाले आहेत. 9 हजार 900 जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
दिल्लीतील आरोग्य मंत्री कोरोना निगेटिव्ह
मुंबईपाठोपाठ राजधानी दिल्लीमधील रूग्णसंख्याही झपाटय़ाने वाढत आहे. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना तीव्र तापाबरोबरच श्वास घेण्याचा त्रास सुरू झाला. त्यांना राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. याचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.