गोखळीतील सहावर्षीय स्वराचा विक्रम
प्रतिनिधी/ फलटण
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील इयता पहिलीतील सहा वर्षांच्या कु. स्वरा योगेश भागवतने एका मिनिटात 100 पुशअप्स मारत विक्रम केला. तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लॉकडाऊनमध्ये स्वराने व्यायाम करण्यास सुरुवात केली. स्वराच्या दिवसाची सुरुवात रोज पहाटे चार वाजता होते. काही दिवसांपूर्वी स्वराने 143 किलोमीटर सायकलिंग करून विक्रम केला आहे. पुन्हा स्वराने एक मिनिटात 100 पुश अप्स मारून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. स्वरा ही सहा वर्षाची कन्या असुन स्विमिंग, सायकलिंग, रनिंग, स्किपिंग, पुशअप्स, ट्रेकींग पुलअप्स, योगासन इ. नियमित व्यायाम करण्यात तरबेज आहे.
पद्मासनात मेडिटेशन एक तास करते हे देखील वयाच्या सहाव्या वर्षी एक कमालच आहे. बारामती सायकल क्लब पुरुष महिला आणि लहान विद्यार्थी असे एकुण 81 सदस्यांनी तिच्या या कामगिरीचे कौतुक केले.
स्वरा भागवतने केलेल्या विक्रमाची दखल महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघ. कोल्हापूर, बारामती, फलटण स्पोर्ट्स क्लब, के. बी. एक्सपोर्ट विविध संस्थांनी स्वराचा गौरव करून पुढील वाटचालीसाठी व राष्ट्रीय विक्रमासाठी शुभेच्छा देवून तिला आगामी काळात सहकार्य व मदत करण्याची ग्वाही दिली.