ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे आज दिल्लीमध्ये 70 जागांसाठी मतदान झाले. आता राजधानीचे वारे कोणाकडे वाहतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. 11 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होत असली तरी दिल्लीवर कोण राज्य करणार? अरविंद केजरीवाल सत्ता राखणार की दिल्लीमध्ये सत्तांतर होणार हे अंदाज समोर आले आहेत.
एक्झीट पोल नुसार यावर्षी ही पुन्हा एकदा फिर एक बार केजरीवाल सरकार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यंदा आम आदमी पार्टीला 49 ते 63 जागा मिळू शकतात. भाजपला 5 ते 19 जागा तर काँग्रेसला 0 ते 4 जागा मिळू शकतात असा अंदाज सीव्होटर सर्वेनुसार व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, दिल्ली विधनसभेच्या 70 जागांसाठी आज सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान झाले. विधानसभेच्या 70 जागांसाठी 672 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
दरम्यान 2015 मध्ये आम आदमी पार्टीने 70 पैकी 67 जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळी भाजपकडे 03 तर काँग्रेसकडे एकही जागा नव्हती.