रेल्वे बोर्डाचा निर्णय, सर्व रेल्वे स्थानकांना सुचना, सामान्य प्रवाशांची सोय
प्रतिनिधी / मिरज
कोरोनाच्या प्रदिर्घ कालखंडानंतर सर्वसामान्य प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या सर्वच एक्सप्रेस रेल्वेतून प्रवासासाठी आता सर्वच सामान्य प्रवाशांना जनरल तिकिट देण्यात येणार आहे. रेल्वे बोर्डाने तशा सुचना विविध रेल्वे स्थानकांना केल्या असून, एक्सप्रेस रेल्वेच्या साध्या तिकिट वितरणासाठी स्वतंत्र कक्ष सुरू केले जाणार आहे.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे सामान्य प्रवाशांची सोय झाली आहे. लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्य़ांमध्ये सर्वच प्रवाशांना जनरल तिकिट दिले जाणार आहे. रेल्वे बोर्डाच्या या निर्णयामुळे सामान्य प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.