नवी दिल्ली : महिंद्रा कंपनीच्या नव्या एक्सयुव्ही 700 या मॉडेलला ग्राहकांनी भरघोस प्रतिसाद दिल्याचे पहावयास मिळत आहे. लाँचिंगच्या किमतीवर सदरच्या गाडीचे बुकिंग सुरु झाले असून यामध्ये तब्बल 57 मिनिटाच्या दरम्यान 25,000 गाडय़ा बुक करण्यात आल्या आहेत. सदरची कामगिरी ही भारतीय वाहन उद्योगामधील ऐतिहासिक मानली जात आहे.
उपलब्ध माहितीनुसार ‘एक्सयुव्ही700’ने प्राप्त केलेली हि कामगिरी देशातील पहिलीच कामगिरी असल्याची माहिती आहे. कंपनीने नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून हे बुकिंग सुरु केले होते, यामध्ये एका तसातच ते हाऊसफुल्ल झाले. पुढील बुकिंग 8 ऑक्टोबरच्या सकाळी 10 वाजता सुरु होणार आहे. डिलरशीप किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मच्या मदतीने ग्राहकांना ते करता येणार आहे.