ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 8 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. दरम्यान, प्रचारसभेचा जोर वाढतो आहे. भाजपाचे नेते केजरीवाल यांच्याविरोधत आक्रमक झालेले दिसत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली.
ते म्हणाले, दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ येते आहे तसं अरविंद केजरीवाल हनुमान चालीसा गाताना दिसत आहेत. एक दिवस असा येईल ज्यादिवशी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसीही हनुमान चालीसा वाचतील.