प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हा परिषद, सातारा शिक्षण विभाग प्राथमिक यांच्यावतीने अध्यक्ष सातारा जिल्हा परिषद, सातारा यांच्या सुचनेनुसार एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम नुकताच सुरू करण्यात आला आहे. या भेटीमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत पदाधिकारी व अधिकारीवर्ग शाळेस भेट देणार आहेत.
या महिन्यात सदर उपक्रम दि. 24 नोव्हेंबर रोजी राबविण्यात येत आहे. पुढील महिन्यापासून सदर उपक्रम हा प्रत्येक महिन्याच्या तिसऱया बुधवारी राबविण्यात यावा. तसेच सदर दिवशी भेट देणे शक्य नसल्यास किंवा शाळेची सुट्टीचा दिवस असल्यास सदर शाळा भेट दुसऱया दिवशी करावी व सोबतच्या शाळा भेट प्रपत्रामध्ये माहिती भरून संबंधीत शाळेच्या मुख्याद्यापकांना मार्फत प्रपत्र गटशिक्षणाधिकारी कार्यालयास संकलित करावे व गट शिक्षणाधिकारी यांनी तालुकास्तरावर माहिती संकलित करून जिल्हास्तरावरून देण्यात येणाऱया लिंकवर भेटीच्या दिवशी माहिती भरावी, असे सातारा जिल्हा परिषद सातारा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) धनंजय चोपडे यांनी कळविले आहे.