देशभरात ’वन नेशन, वन रेशन कार्ड’ ही मोहीम येत्या वर्षात लागू होणार.
रोजंदारीवर काम करणारे कामगार, स्थलांतरित कामगार यांना याचा सर्वाधिक फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. या योजनेंतर्गत देशातील कोणत्याही भागातील रेशन दुकानातून एकाच कार्डने सामान घेता येणार आहे.
&ई-पॉस (इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल) उपकरणावर बायोमेट्रिक किंवा आधार कार्डच्या पडताळणीवर ही योजना अवलंबून आहे. ज्या रेशन दुकानांमध्ये पूर्णत: ऑनलाइन ई-पॉस सेवा आहे त्याच दुकानांत ही योजना उपलब्ध असणार आहे. ज्या कामगारांना रोजगारासाठी किंवा इतर काही कारणांमुळे वेगवेगळय़ा ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागते अशांना ही योजना सर्वाधिक उपयुक्त ठरणार आहे.
असा होईल फायदा
या कार्डचा वापर जनतेला सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक सेवेच्या तिकिटाचे पैसे देण्यासाठी तसेच अन्य सेवांसाठीही हे कार्ड उपयोगात आणता येईल. रुपेद्वारे देण्यात येणाऱया या कार्डचा नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणूनही वापरता येणार आहे.
कार्डचा वापर केल्यानंतर काय होणार फायदा
n रुपे कार्ड पार्टनर बँक डेबिट, पेडिट आणि प्रीपेड कार्डच्या रुपात इश्यू करता येईल.
n कार्डवर नसेल कार्डधारकाचे नाव
n वन नेशन वन कार्ड पूर्णपणे कॉन्टॅक्टलेस कार्ड असणार आहे. मेट्रो रेल स्मार्टकार्डप्रमाणेच या कार्डवरही कार्डधारकाशी संबंधित कोणतीही माहिती असणार नाही.
n हे कार्ड एसबीआय, पीएनबीसह देशभरात 25 बँकेत उपलब्ध होणार आहे.
n पेटीएम वरूनही घेता येईल कार्ड
n वन नेशन वन कार्ड पेटीएम पेमेंट बँकेतूनही घेता येईल.
n शॉपिंग आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची तिकिटे खरेदी करता येणार.
n या कार्डचा वापर आपल्याला शॉपिंग सोबतच बस, मेट्रो किंवा अन्य सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची तिकिटे खरेदी करण्यासाठी करता येईल.
n महामार्गावर प्रवास करताना येणाऱया टोल आणि पार्किंगचे पैसे देण्यासाठी हे कार्ड वापरता येईल.
n मेक इन इंडियाचा प्रकल्प
n ही प्रणाली ऑटोमेटिक फेअर कलेक्शन गेट (SWAGAT) आणि ओपन लूप ऑटोमेटिक फेअर कलेक्शन सिस्टम (SWEEKAR) या दोघांनी एकत्रितपणे विकसित केली आहे.