केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांची भावना
पणजी /प्रतिनिधी
आज मी आणखी एक बरा झालेला रुग्ण आणि कोविड-19 महामारी आजारातून बाहेर पडलेली एक नवीन जन्म घेतलेली व्यक्ती म्हणून उदयास आलो आहे, पण त्याचबरोबर एक अतिशय सकारात्मक बदल झालेली व्यक्ती देखील बनलो आहे, अशी भावना केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) व राज्य रक्षामंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केली आहे.
14 ऑगस्ट रोजी आपणाला गोव्यात मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि तेव्हापासून मी बरेच चढउतार पाहिले. माझ्या आयुष्याच्या या टप्प्यात मी या देशातील वैद्यकीय कर्मचारी कोविडशी लढण्यासाठी केलेल्या अलौकिक प्रयत्नांचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. या सर्व कोविड हिरोना आपला सलाम असल्याचे श्री. नाईक पुढे म्हणाले.
आपणाला सहकार्य दिलेल्या युनिटचे प्रमुख मनीष त्रिवेदी यांचे विशेष कौतुक असून ज्यांनी आवश्यक ते प्रत्येक संसाधन उपलब्ध असल्याचे सुनिश्चित केले.
मणिपाल टीमचे कोविड केअर इंटरनेस्टिस्ट्सचे डॉ. मिलिंद नाईक, अमोल महालदार (इंटरेसिस्ट्स), डॉ. गौरेश पलाव, डॉ. मीशा सेठी, डॉ. इलेन रॉड्रिग्स आणि माझे प्लोमोनोलॉजिस्ट डॉ. प्रभु प्रसाद, रिवा बार्नेटो, जिनो पाउलोस, नम्रता नाईक यांच्या नेतृत्वाखालील नर्सिंग चमू तसेच असंख्य अन्य परिचारिका, ज्यांनी मला बरे होण्यास मदत केली, मणिपाल रुग्णालयातील विविध कनि÷ निवासी डॉक्टर व इतर साहाय्यक तज्ञ, वेळेवर दान , चाचणी, रक्तसंक्रमणांची व्यवस्था करून कॉन्व्हॅलेसेन्ट प्लाझ्माची मला संजीवनी देण्याची जबाबदारी मुख्यत: डॉ. धवल फड्डू यांच्यावर होती, एम्स नवी दिल्ली येथील तज्ञ डॉ. अनंत मोहन (पल्मोनोलॉजीचे प्रमुख), डॉ. राजेश्वरी (अयनेस्थेसिया आणि ट्रॉमा सेंटर प्रमुख) आणि दोनवेळा गोवाला आलेले संचालक डॉ. रणदीप गुलेरिया जे सतत मणिपाल रुग्णालयात डॉक्टर्सना मार्गदर्शन व प्रोत्साहन देत होते. आर्मी हॉस्पिटल, नवी दिल्ली यांच्याकडून आलेले डॉक्टर्स, गोवा मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर व रुग्णालयात मला नेहमी भेट देणारे डॉ. उदय काकोडकर, डॉ. अनार खांडेपारकर, गोमंतकियांना कोविडमध्ये लढा देण्यासाठी सदोदित मदत करणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केलेल्या सर्व कामांचे मी मनापासून कौतुक करतो. त्यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळावे यासाठी मी सर्वशक्तिमान देवाची प्रार्थना करतो, असेही केंद्रीय मंत्री नाईक यांनी म्हटले आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या आरोग्याची काळजी जाणून घेण्यासाठी वेळ काढला. त्यामुळे आपण प्रभावित झालो आहे. डॉ. शेखर साळकर यांचेही मी खूप उपकारी आहे. इतर रुग्णांना माझ्यासारखे आयुष्य मिळावी यासाठी केलेल्या सर्व प्रयत्नांमध्ये देव त्याना आरोग्य व यश देवो, असेही केंद्रीय मंत्री नाईक यांनी म्हटले आहे.
पत्नी श्रीमती विजया ज्यानी गेले चार आठवडे माझ्यासोबत रुग्णालयात घालवले. माझे सर्व कुटुंब आणि माझ्या लाखो अनुयायांचे विस्तारित कुटुंब ज्यांनी मला त्यांच्या प्रार्थनांमध्ये समावेश केला. माझे कार्यकर्ते आणि कर्मचारी तसेच प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे आलेल्या देणगीदार या सगळय़ांचे आभार मानतो, असेही मंत्री नाईक यांनी म्हटले आहे.
लोकसेवेतून सेवा करण्याची आपणाला आणखी एक संधी दिल्याबद्दल सर्वसमर्थ ईश्वर व माझ्या मातृभूमीचे आपण आभार मानतो. आपण काही दिवस विश्रांती व सावधगिरी घेत आहे. लवकरच सार्वजनिक सेवेत सामील होणार आहे व विशेषतः कोविडविरुद्ध लढण्यास सर्वांबरोबर असणार असल्याचेही केंद्रीय मंत्री नाईक यांनी म्हटले आहे.