वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
येत्या दोन महिन्यात अमेरिकेत एक लाख नोकरीसंबंधीची ग्रीन कार्डे वाया जाण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. यामुळे अमेरिकेतील भारतीय समाजात संतापाची भावना निर्माण झाली असून एकीकडे तेथील भारतीयांना अमेरिकेचे कायदेशीर कायमचे निवासी म्हणून मान्यता मिळविण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पहावी लागते. तर दुसरीकडे हजारोच्या संख्येने ग्रीन कार्डे वाया घालविली जातात, याबद्दल अमेरिकेतील भारतीय समाजाच्या लोकांमध्ये कमालीची नाराजी आहे.
यंदाच्या वषी अमेरिकेने ग्रीन कार्डांच्या संख्येत वाढ केली होती. दरवषी साधारणतः 1 लाख 40 हजार ग्रीन कार्ड देण्यात येतात. यावषी त्यांची संख्या 2 लाख 61 हजार 500 पर्यंत वाढविण्यात आली होती. मात्र, अमेरिकेतील कायद्यानुसार 30 सप्टेंबरपर्यंत जेवढी ग्रीन कार्डे वितरित केली जातील तितकीच वैध मानली जातात. उरलेली वाया जातात. 30 सप्टेंबरनंतर ग्रीन कार्डांचा नवा कोटा घोषित केला जातो. त्यामुळे येत्या सहा-सात आठवडय़ात बायडन प्रशासनाने पावले न उचलल्यास 1 लाखाहून अधिक ग्रीन कार्डे वाया जाणार आहेत.
न्यायालयात याचिका
घोषित करण्यात आलेली कार्डे पूर्णतः वितरित न झाल्यामुळे काही भारतीय आणि चिनी वंशाच्या नागरिकांनी अमेरिकेच्या न्यायालयात दाद मागितली आहे. अमेरिकेत हजारोंच्या संख्येने कायदेशीर स्थलांतरित राहात आहेत. त्यांना ही ग्रीन कार्डे दिल्यास त्यांच्या अमेरिकेतील वास्तव्याला स्थैर्य प्राप्त होऊ शकते. यातून अमेरिकेचाही मोठा फायदा होऊ शकतो, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.