कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाची खबरदारी
प्रतिनिधी / बेळगाव
लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱयांनी घेतला होता. त्यांनी केलेल्या सूचनेनुसार 1 हजाराहून अधिक मतदार असलेल्या केंद्रात मतदान केंद्रांची विभागणी करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी मतदान केंद्रांची पाहणी सुरु केली असून मनपा अधिकाऱयांना विविध सूचना केल्या.
महापालिका निवडणुकीसाठी वार्डनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे. मात्र अद्याप अंतिम आरक्षण जाहीर झाले नाही. याचदरम्यान लोकसभा पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे प्रथम लोकसभा पोटनिवडणूक होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मतदार यादी तयार करणे, मतदान केंद्रांची पाहणी करणे तसेच निवडणूक घेण्याच्या दृष्टीने आवश्यक तयारी निवडणूक विभागाने चालविली आहे. निवडणूक विभागाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱयांनी बेळगावला भेट देवून निवडणूक तयारीचा आढावा घेतला. कोरोना विषाणू प्रसारामुळे आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना निवडणूक अधिकाऱयांनी केली आहे. 1 हजाराहून अधिक मतदान असलेल्या केंद्रांवर नागरिकांची गर्दी होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी मतदान केंद्रांची विभागणी करण्याची सूचना राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱयांनी केली. तसेच मतदार यादीची विभागणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मतदान केंद्रांतील मतदाराची माहिती घेवून मतदार यादीची विभागणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे 1 हजाराहून मतदान असलेल्या केंद्रांची पाहणी करून पर्यायी मतदान केंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त जगदीश के. एच यांच्यासह महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर, महसूल निरिक्षक यल्लेश बचलपूरी यांनी मतदान केंद्रांची पाहणी केली. मनपा अधिकाऱयांना विविध सूचना केल्या. त्यामुळे मतदान केंद्रांची विभागणी होणार आहे. जर मतदान केंद्रात जागा उपलब्ध नसल्यास नजीकच्या दुसऱया केंद्रात स्थलांतर करण्याची शक्मयता आहे.