नवी दिल्ली
एचडीएफसी बँकेने ग्रेटर नोएडा येथील जेवर विमानतळ विकासासाठी 500 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाच्या निधीसंदर्भात एचडीएफसी बँकेने एक करारही केला आहे. याअंतर्गत सदरच्या कर्जाऊ स्वरूपातील रकमेचा वापर हा पायाभूत सुविधा आणि जमिनीच्या ताब्याकरता केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आशियातील सर्वात मोठे विमानतळ म्हणून ग्रेटर नोएडातील जेवर विमानतळाची गणना होणार आहे. यमुना एक्सप्रेस वे प्राधिकरणकडून गौतम बुद्ध नगर जिह्यातील पाच हजार एकर जागेवर सदरचे विमानतळ विकसित केले जाणार आहे.