वर्ष 2021-22 मधील आकडेवारीचा समावेश
नवी दिल्ली ः घर बांधणीसाठी कर्जपुरवठा करणारी कंपनी म्हणून कार्यरत असणाऱया एचडीएफसीने चालू आर्थिक वर्षात दोन लाख कोटी रुपयांच्या गृहकर्जास मंजुरी दिली आहे. सदरची आकडेवारी ही सर्वाधिक असल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली आहे.
घर बांधणीकरीता संपूर्ण देशातून मागणी वाढली असून यामध्ये कंपनीने 2.7 लाखापेक्षा अधिकच्या ग्राहकांना कर्ज देत सर्वाधिक कर्ज वितरण करणारी कंपनी ठरली आहे. कंपनीने डिसेंबर 2021 पर्यंत सबसिडी योजनेच्या अंतर्गत एकूण 45,914 कोटींचे कर्ज वितरण केले आहे.
शहरीकरणामुळे मागणी वाढली
मी मागील साडेचार दशकातील घरबांधणी क्षेत्रासाठीची इतकी मजबूत स्थिती पाहिली नाही. कमी व्याजदरासोबत मालमत्तांच्या किंमतीही स्थिर राहिल्या आहेत. ज्याचा फायदा ग्राहकांना उठवता येतो आहे. तसेच सरकारने घर बांधणीस
चालना दिल्याने शहरीकरणास चालना मिळत गेली असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रेणू सुद कर्नाड यांनी स्पष्ट केले आहे.