नवी दिल्ली
कर्ज वितरण क्षेत्रात कार्य करणारी वित्तसंस्था हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन अर्थात एचडीएफसीला डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात घट अनुभवावी लागली आहे. कंपनीचा नफा 65 टक्क्यांनी घटून 2 हजार 926 कोटी रुपये झाला आहे. पण दुसरीकडे निव्वळ व्याज उत्पन्नात मात्र 26 टक्के वाढ झालेली आहे. मागच्या वर्षाच्या समान कालावधीत निव्वळ नफा 8 हजार 372.5 कोटी रुपये इतका झाला होता. निव्वळ नफ्यात झालेली 65 टक्के घट कंपनीसाठी चिंता वाढवणारी मानली जात आहे. निव्वळ व्याज उत्पन्न 4 हजार 68 कोटी रुपयांवर पोहचले आहे. कंपनीच्या