नवी दिल्ली
येणाऱया उत्सवी काळासाठी खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक ग्राहकांसाठी सवलतीत वस्तू घेण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. जवळपास पन्नास टक्क्मयांपर्यंत सवलतीचा लाभ या बँकेच्या कार्डधारकांना मिळू शकणार असल्याचे बँकेच्या सूत्रांकडून सांगण्यात येते. येणाऱया काळात विविध सवलती आणि आकर्षक योजना बँकेकडून सादर केल्या जाणार आहेत. ग्रामीण भागातील ग्राहकांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी बँक प्रयत्न करणार आहे. गॅजेट आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर मोठय़ा प्रमाणात सवलत देण्याची योजना आहे. आयफोन, आयपॅड यासारख्या उत्पादनांवर 7000 रुपयेपर्यंतची रोख सवलत ग्राहकांना मिळणार आहे.