वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गृहकर्ज देणारी कंपनी एचडीएफसीकडून व्याजदरात कपात करण्यात आली आहे. ही कपात कंपनीने 0.15 टक्क्मयांनी कमी केली आहे. कर्जाच्या मागणीत होणारी कमी लक्षात घेऊन एचडीएफसीने घराच्या कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. यामध्ये पहिल्यांदा देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँकेने विविध कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत.
नवीन सादर करण्यात येणारे क्याजदर हे 22 एप्रिलपासून अंमलात येणार असल्याचे म्हटले आहे. या व्याजदर कपातीचा लाभ एचडीएफसीच्या सर्व व किरकोळ गृहकर्ज घेणाऱया ग्राहकांना मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मागील काही दिवसांपासून अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला असताना त्याला चालना देण्यासाठी आरबीआयने विविध आर्थिक घोषणा व रेपो, रिर्व्हस रेपो दरात कपात करण्याविषयीचे लाभदायी निर्णय घेतले आहेत. याचा लाभ बँकिंगसह अन्य आर्थिक क्षेत्रांना करुन देण्यावर भर देण्यात आला आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या संकटात अशी घोषणा म्हणजे चिंतेत असणाऱया ग्राहकांना मोठा दिलासा असल्याचे बोलले जात आहे.