नवी दिल्ली : गृहकर्ज वितरण क्षेत्रातील एचडीएफसी संस्थेने आपल्या गृहकर्ज व्याजदरात 5 बेसीस पॉईंटस्ने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांचा गृहकर्जावरचा व्याजाचा हप्ता कमी होणार आहे. तमाम घरखरेदीदारांना सध्याला व्याजदर कपातीचा लाभ मिळताना दिसतो आहे. गेल्या दोन-चार दिवसात दोन बँकांनी व्याजदर कपात केली आहे. याला अनुसरून हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन अर्थात एचडीएफसी यांनी एसबीआय, कोटक महिंद्रा बँक यांच्या पावलावर पाऊल ठेवून संस्थेने आपलेही गृहकर्ज व्याजदर कमी करत स्पर्धेत रंगत भरली आहे. येणाऱया काळामध्ये इतर बँका, वित्तसंस्थाही गृहकर्ज व्याजदरात कपात करण्याच्या दिशेने निर्णय घेताना दिसतील. एचडीएफसीने 5 बेसीस पॉईंटस्ने कपात करत 6.75 टक्के इतका नवा व्याजदर गुरुवारपासून आकारला आहे. दरम्यान शेअर बाजारात बुधवारी एचडीएफसीच्या समभागाच्या भावामध्ये या बातमीनंतर 3 टक्के इतकी वाढ नोंदविली गेली.
Previous Articleधडपड : राजकारण्यांची अस्तित्वासाठी, सामान्यांची जगण्यासाठी
Next Article सराव शिबिरासाठी धोनी चेन्नईत दाखल
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.