वृत्तसंस्था/ मुंबई
एचडीएफसी बँकेच्या पेडिटकार्ड विक्रीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने बंदी घातली होती. परंतु पुन्हा एकदा ही बंदी मागे घेतल्याने एचडीएफसी बँकेला दिलासा मिळाला आहे. बंदी मागे घेतल्यानंतरच्या पहिल्या दोन ते तीन दिवसांमध्ये क्रेडिट कार्डसाठी लाखोच्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. बँकेचे पहिले ध्येय हे मागील 8 ते 9 महिन्यांच्या कालावधीत झालेले नुकसान भरुन काढणे हे राहणार असल्याची माहिती आहे.
बँकेने प्रती महिना पाच लाख क्रेडिट कार्ड सादर करण्याचे ध्येय निश्चित केले असून फेब्रुवारी 2022 पासून हे ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
मागील आठवडय़ात मिळाला दिलासा
खासगी क्षेत्रातील देशातील दिग्गज बँक एचडीएफसीला मागील आठवडय़ात आरबीआयने क्रेडिट कार्ड सादर करण्यास मंजुरी दिली.
पेटीएमसोबत भागीदारी
बँकेने पेटीएमसोबत करार केला आहे. याच्याअंतर्गत बँक डिजिटल बँकिंग सेवांसह इतर सेवा उपलब्ध करणार आहे. या भागीदारीतून पेमेन्ट गेटवे आणि पॉईंट ऑफ सेलची सुरुवात मर्चंट्ससाठी करण्यात येणार आहे.