दुसऱया तिमाहीतील आकडेवारी : आतापर्यंत समाधानकारक आकडय़ांचा बँकेचा दावा
वृत्तसंस्था/ मुंबई
खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळख असणाऱया एचडीएफसी बँकेकडून दुसऱया तिमाहीत मजबूत कामगिरीची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये बँकेच्या कर्ज विभागात 16 टक्के तर डिपॉझिटमध्ये 20 टक्क्मयांच्या वाढीची नोंद करण्यात आली आहे.
सदरची वाढही बँकिंग क्षेत्रातील सर्वाधिक असल्याचे मानले जात आहे. कारण वर्षाच्या आधारे 11 सप्टेंबरपर्यंत या क्षेत्राची डिपॉझिट वाढ ही 12 टक्क्मयांच्या आसपास राहिली तर कर्जाची वाढ 5.3 टक्क्मयांवर राहिल्याची माहिती आहे.
एचडीएफसी बँकेने सदरची माहिती ही शेअर बाजाराला दिली आहे. यामध्ये तिमाहीचे अहवाल पूर्णपणे सादर करण्याअगोदरच ही माहिती दिल्याची माहिती असून यात सप्टेंबर तिमाहीच्या अंतिम कालावधीपर्यंत एकूण डिपॉझिट हे 12.3 लाख कोटी रुपयांवर राहिले आहे. एक वर्षाच्या अगोदर समान तिमाहीत हा आकडा 10.2 लाख कोटी रुपये होता. तसेच सदर कालावधीत बँकेने 10.4 लाख कोटी रुपयांचे कर्जही ग्राहकांना दिले आहे. जे एक वर्षाच्या अगोदर सप्टेंबर तिमाहीत 9 लाख कोटी रुपये होते.
डिव्हिडंडमध्ये घट
उपलब्ध माहितीनुसार डिव्हिडंडच्या उत्पन्नात दुसऱया तिमाहीमध्ये घट होत 323 कोटी रुपये राहिले आहे. जे एक वर्षाच्या अगोदरच्या सप्टेंबर तिमाहीत 1,074 कोटी होते. एचडीएफसीच्या समभागाच्या विक्रीचा कोणताही लाभ झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.