मुंबई : भारतातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसीच्या चेअरमनपदी अतून चक्रवर्ती यांची नियुक्ती होणार असल्याचे सांगितले जात आहे. आर्थिक विषयाचे सचिव म्हणून अतून सध्या सेवा बजावत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे सदरच्या पदासाठी अतून यांचा अर्ज एचडीएफसी बोर्ड सदस्यांनी नुकताच दाखल केला असल्याचे समजते. याला रिझर्व्ह बँकेकडून मान्यता मिळाली असल्याने चेअरमनपदाची जबाबदारी अतून चक्रवर्ती हे लवकरच स्वीकारतील. दरम्यान सध्याच्या चेअरमन श्यामला गोपीनाथ यांची कारकिर्द 1 जानेवारी 2021 रोजी संपुष्टात येत आहे.
Previous Articleलक्झरी कार्सच्या विक्रीत घट
Next Article कल्पतरु पॉवरला मिळाले 900 कोटींचे कंत्राट
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.