रुग्णालयामध्ये उभारणार ऑक्सिजन प्रकल्प
वृत्तसंस्था/ मुंबई
एचडीएफसी बँक देशात मेडिकल पायाभूत सुविधा देण्यासाठी व आहे त्या सुविधा मजबूत करण्यासाठी योगदान देणार असल्याची माहिती आहे. या सेवांसाठी विविध उपाययोजनाची घोषणा केली आहे. सदरच्या मदतीच्या योजनेमुळे कोरोना विषाणुशी टक्कर देण्यास मोठी मदत होणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.
एचडीएफसी बँकेने दिलेल्या माहितीनुसार बँक आर्थिक वर्ष 2021-22 च्या दरम्यानच्या बदलानुसार कोविडसाठी जवळपास 100 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. आर्थिक वर्ष 2020-21 या कालावधीत बँकेने या कार्यासाठी पहिल्या टप्प्यात 120 कोटी रुपयाचे योगदान दिले आहे.
बँकेने दिलेली सुविधा
भारतामधील विविध रुग्णालयात 20 ऑक्सिजन प्रकल्पांची स्थापना केली असून 100 बेड क्षमता असणाऱया तीन कोविड केंद्रांची स्थापना दोन आयसोलेशन केंद्राची निर्मिती केल्याची माहिती आहे. यामध्ये मेडिकल पायाभूत सुविधा, ऑक्सिजन प्रकल्प, मेडिकल साहित्य, आयसीयूची साधन सामुग्रीची व्यवस्था करण्यासह देशात हॉस्पिटलमध्ये औषधांचा पुरवठा उपलब्ध करुन देण्यावर भर असणार आहे.