वृत्तसंस्था/ मुंबई
खासगी क्षेत्रातील दिग्गज एचडीएफसी बँक नवीन क्रेडिट कार्ड सादर करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये पेटीएमसोबत सहब्रँण्डेड केले आहे. यात हे व्हिसा कार्ड राहणार आहे. बँकेने सांगितल्याप्रमाणे सदरचे कार्ड येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत सादर करण्यात येणार आहे.
येत्या काळात दसरा-दिवाळी असे मोठे सण साजरे होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना विशेष सेवा देण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला आहे. डिसेंबरपर्यंत ग्राहकांकडे उपलब्ध होणार आहे. बँकेकडे 5.1 कोटी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि प्रीपेड कार्ड ग्राहक आहेत.
पेटीएम ग्राहकांना मिळणार सहकार्य
पेटीएमच्या कोटय़वधी ग्राहकांना सहकार्य मिळणार असल्याचे बँकेने म्हटले आहे. या करारासह देशातील लहान शहरांमध्ये बँकेची पकड आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे. यासोबत देशभर डिजिटल पेमेंटचा विस्तार होण्यास गती मिळणार असल्याचे नमूद केले आहे. बँक आणि पेटीएम बिझनेस क्रेडिटकार्डही सादर करणार आहे.