नवी दिल्ली
एचडीएफसी लाइफ कंपनीला 2020-21 आर्थिक वर्षाच्या दुसऱया तिमाहीत 6.1 टक्के इतका निव्वळ नफा झाला आहे. जीवन विमा क्षेत्रात कार्यरत या कंपनीने सदर तिमाहीत 327.83 कोटी रुपये इतका नफा कमावला असून मागच्या वर्षी हा नफा 208.98 कोटी रुपये इतका होता. चालू आर्थिक वर्षात सप्टेंबरच्या तिमाहीदरम्यान कंपनीचे एकूण उत्पन्न 90 टक्के इतके वाढले आहे. हे उत्पन्न 16 हजार 426.03 कोटी रुपये इतके नोंदले गेले, जे गेल्या वर्षी 8 हजार 661.33 कोटी रुपये इतके होते.