प्रतिनिधी /बेळगाव
एचपीसीएलने आपल्या ग्राहकांसाठी पॉवर धमाका हे अभियान सुरू केले आहे. टाईम्स ऑफ इंडिया ग्रुपच्या सहकार्याने हे अभियान कर्नाटक, आंध्रप्रदेश व तेलंगणा येथे राबविण्यात येत आहे. एचपीसीएलचे दक्षिण प्रांताचे सीजीएम सी. के. नृसिंहा यांनी ऑनलाईन माध्यमातून या अभियानाचे उद्घाटन केले. 4 फेब्रुवारी ते 31 मार्च 2022 पर्यंत हे अभियान चालणार आहे.
या अंतर्गत ग्राहकांनी दुचाकी व तीनचाकीसाठी 250 रुपये किमतीची उर्जा (पॉवर) खरेदी केल्यास व चार चाकी वाहनांसाठी 750 रुपयांची उर्जा खरेदी केल्यास त्यांना आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत. एचपीसीएलच्या कोणत्याही नजीकच्या आऊटलेट सेलिंग पॉवरमधून ग्राहक ही सुविधा उपलब्ध करून घेवू शकतात.
या अभियानातील बंपर बक्षीस हे कार असून अन्य बक्षिसांमध्ये दुचाकी, सोन्याचे नाणे, चार शेगडींचा स्टो अशी बक्षिसे आहेत. बेळगावमध्ये एचपीसीएलचे विभागीय डीजीएम एम. संदीप रेड्डी यांनी कंपनीच्या उद्यमबाग येथील आऊटलेट येथे या अभियानाचा शुभारंभ केला.