:कोविड 19 चा वाढता मुक्काम हा जनजीवन विस्कळीत करीत आहे. अनेक उद्योगांनी नवीन मार्गाचा अवलंब करत आपला व्यवसाय सुरु केला आहे तर अन्य कंपन्या कर्मचारी कपात व त्यांच्या वेतन कपातीचा निर्णय घेत आहेत. यामुळे उद्योग क्षेत्र दबावात राहिलेले आहे. परंतु या वातावरणातही हिंदुस्थान कॉम्प्युटर लिमिटेड (एचसीएल) यांनी कर्मचारी कपात तसेच त्यांच्या वेतनात कपात न करण्याची घोषणा केली आहे.
कंपनी जवळपास दिड लाख कर्मचाऱयांच्या वेतनात कपात न करण्यासोबत त्यांना मागील वर्षातील बोनस देणार आहे. या अगोदर 2015 च्या आर्थिक वर्षातील योजनेनुसार चालू वर्षात 15 हजार प्रेशर्सना रोजगार देणार असल्याची घोषणा केली आहे. कंपनी जवळपास 5 हजार जणांना भरती करणार असल्याचे कंपनीचे मुख्य एचआर अप्पारावर व्हीव्ही यांनी म्हटले आहे. वेतन वाढ आणि अन्य महत्वाचे निर्णय मात्र येत्या जुलै महिन्यानंतर घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
………………………………