दिल्ली
एचसीएल टेक्नॉलॉजीस कंपनीने ऑस्ट्रेलियातील आघाडीवरची कंपनी डीडब्ल्यूएस लिमिटेडचे अधिग्रहण करण्याचे अंतिम केले आहे. डीडब्ल्यूएस ही ऑस्ट्रेलियातील आयटी, व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील सल्लागार कंपनी आहे. 158 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सला हा व्यवहार होणार असल्याचे सांगण्यात येते. यासंदर्भात डीडब्ल्यूएसच्या भागधारकांच्या मंजुरीनंतर पुढची कार्यवाही पार पाडली जाणार असल्याचे एचसीएलने सांगितले. डीडब्ल्यूएसमध्ये सध्या 700 कर्मचारी कार्यरत असून मेलबॉर्न, सिडनी, ऍडलेड, ब्रिस्बेन आणि कॅनबेरा याठिकाणी कंपनीची कार्यालये आहेत. एचसीएलला या अधिग्रहणानंतर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये व्यवसायाकरीता ग्राहक मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.