प्रतिनिधी/ बेळगाव
एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाताना खबरदारी घेतली नाही तर आपल्या खात्यातील रक्कम क्षणार्धात गायब होऊ शकते. अशा अनेक टोळय़ा जिल्हय़ात कार्यरत आहेत. बेळगाव व रामदुर्ग तालुक्मयात या टोळीतील गुन्हेगारांनी अनेकांची फसवणूक केली आहे. रामदुर्ग पोलिसांनी पाच दिवसांपूर्वी एका भामटय़ाला अटक केली आहे.
‘तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे. नव्या कार्डसाठी जुन्या कार्डवरील क्रमांक सांगा’, ‘ओटीपी नंबर द्या’ असे सांगत बँक खात्यातील रक्कम परस्पर हडप करणाऱया आंतरराज्य टोळीच्या कारवाया वाढलेल्या असतानाच पैसे काढण्यासाठी एटीएम चेंबरमध्ये रांगेत उभे राहून फसवणूक करणाऱया भामटय़ांच्या टोळय़ा सक्रिय झाल्या आहेत.
उपलब्ध माहितीनुसार 24 ऑक्टोबर रोजी काकती येथील पोलीस दलातील एका निवृत्त कर्मचाऱयाच्या बँक खात्यातून 67 हजारहून अधिक रक्कम काढण्यात आली आहे. या प्रकरणी शनिवारी रात्री उशिरा काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले असून पोलीस संबंधित भामटय़ांचा शोध घेत आहेत.
लक्ष्मीनगर, काकती येथील केंचाप्पा मनगेनी हरके (वय 80) यांनी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. 24 ऑक्टोबर रोजी आपल्या बँक खात्यात शिल्लक पैसे किती आहेत? हे तपासण्यासाठी केंचाप्पा काकती येथील एसबीआयच्या एटीएमला गेले होते. त्याचवेळी पाच-सहा जण एटीएम चेंबरमध्ये अचानक घुसले. नेमक्मया याच वेळी यामधील एका भामटय़ाने आपला पीन नंबर पाहिला होता.
चेंबरमध्ये गर्दी होती. ‘काका, तुमचे पैसे पडले आहेत’, असे एका भामटय़ाने सांगितल्याने केंचाप्पा पडलेले पैसे पाहण्यासाठी खाली वाकले. हीच संधी साधून भामटय़ांनी त्यांचे मशीनमधील एटीएम कार्ड घेऊन त्याजागी दुसरे कार्ड ठेवून दिले. त्यानंतर पळविलेल्या या एटीएम कार्डद्वारे या भामटय़ांनी एकूण 67 हजार रुपयांहून अधिक रक्कम हडप केल्याचे दिसून आले आहे.
एटीएम कार्ड व पीन नंबरचा वापर करून वेगवेगळय़ा एटीएममधून 40 हजार रुपये काढण्यात आले आहेत. एका सराफी पेढीत जाऊन 27 हजार रुपयांचे सोने खरेदी करण्यात आले आहे. या ठिकाणी केंचाप्पा यांच्या कार्डच्या माध्यमातून रक्कम अदा करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. बेळगाव परिसरात अशा अनेक घटना घडल्या आहेत.