नवी दिल्ली / वृत्तसंस्था
डेबिट आणि पेडिट कार्डच्या वापरासंबंधी आरबीआयने नवीन नियम लागू केले असून एटीएममधून रोकड काढणे 1 ऑगस्टपासून महाग होणार आहे. सर्व बँकांच्या एटीएमवरील आर्थिक देवघेवींवरील सध्याची इंटरचेंज फी 15 रुपयांवरुन वाढवून 17 रुपये केली आहे. त्याचप्रमाणे गैर आर्थिक म्हणजे नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शनसाठी असणारी फी 5 रुपयांवरुन 6 रुपये करण्यात आली आहे. 1 ऑगस्टपासून आरबीआयचे हे नवीन नियम लागू होणार आहेत. त्यामुळे आता एटीएमधारकांच्या खिशाला मोठी कात्री लागण्याची शक्मयता आहे. जून 2019 साली आरबीआयने इंडियन बँक असोसिएशनच्या प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्या समितीने केलेल्या शिफारसींच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या बँकांकडून एटीएमची पाच ट्रान्झॅक्शन ग्राहकांना फ्री देण्यात येतात. त्यामध्ये जर वाढ झाली, तर ग्राहकाला 20 रुपये कस्टमर चार्ज लावण्यात येतो. आता या कस्टमर चार्जमध्ये एका रुपयाची वाढ करण्यात आली असून तो 21 रुपये एवढा करण्यात आला आहे. हा नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू करण्यात येणार आहे.