नवी दिल्ली
आयसीआयसीआय बँक नव्या वर्षापासून आपल्या एटीएम वापरावरच्या शुल्कामध्ये वाढ करणार असल्याची माहिती मिळाली आहे. जानेवारी 2022 पासून शुल्कात वाढ केली जाणार आहे. मोफतपणे पैसे काढण्याची मर्यादा ओलांडल्यानंतर जर व्यवहार केला तर एटीएमवर व्यवहार केल्यास त्यावर नव्या वर्षी 21 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. यापूर्वी हे शुल्क 20 रुपये इतके होते.