सोमवारी 9 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
प्रतिनिधी/ बेळगाव
सोमवारी बेळगाव शहर व जिल्हय़ातील 9 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सांबरा एटीएसमधील दोघा जणांचा यामध्ये समावेश आहे. एका बेळगाव तालुक्मयातील 8 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
भाग्यनगर, मिलीटरी हॉस्पिटल, सदाशिवनगर, कणबर्गी, सांबरा एटीएसमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 25 हजार 955 इतकी झाली असून यापैकी 25 हजार 378 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जिह्यातील वेगवेगळय़ा इस्पितळात 235 सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत असून अद्याप 4 हजार 436 जणांचा अहवाल यायचा आहे तर 37 हजार 392 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. सोमवारी रुग्णसंख्येत घट दिसून आली असून सक्रिय रुग्णांची संख्याही घटत चालली आहे.