लंडन : एटीपी टूरवरील होणाऱया पुरूषांच्या व्यावसायिक टेनिस स्पर्धांच्या 2020 च्या कॅलेंडरमध्ये चार नव्या स्पर्धांचा समावेश करण्यात आल्याची घोषणा गुरूवारी एटीपीने केली.
जर्मनीतील कोलॉन शहरामध्ये एटीपी-250 दर्जाच्या पाठोपाठ दोन स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. तसेच सॅर्डीनिया एटीपी टूरवरील क्लेकोर्टवरील स्पर्धेचे यजमानपद भूषवित आहे तर कझाकस्तानमधील नूर-सुल्तान येथे इनडोअर टेनिस स्पर्धा भरविली जाणार आहे. 2020 च्या एटीपी स्पर्धा वेळापत्रकामध्ये या चार नव्या स्पर्धांचा समावेश राहणार आहे. कोलॉन येथील स्पर्धा 12 ऑक्टोबरपासून खेळविली जाणार असून याच दिवशी सॅर्डिनिया येथे क्लेकोर्टवरील टेनिस स्पर्धा सुरू होईल.