वृत्तसंस्था/ पॅरीस
जर्मनीच्या ऍलेक्झांडर व्हेरेव्हने रविवारी सिनसिनॅटी मास्टर्स टेनिस स्पर्धेत एकेरीचे जेतेपद मिळविले. या कामगिरीमुळे सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत व्हेरेव्हने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. सर्बियाच्या जोकोविचने आपले अग्रस्थान मजबूत राखले आहे.
एटीपीच्या ताज्या मानांकन क्रमवारी यादीत सर्बियाच्या जोकोविचने 11113 गुणांसह पहिले, रशियाच्या मेदव्हेदेवने 9980 गुणांसह दुसरे, ग्रीकच्या सित्सिपसने 8350 गुणांसह तिसरे, जर्मनीच्या व्हेरेव्हने 8240 गुणांसह चौथे, स्पेनच्या नदालने 7815 गुणांसह पाचवे, ऑस्ट्रीयाच्या थिएमने 6995 गुणांसह सहावे, रशियाच्या रूबलेव्हने 6400 गुणांसह सातवे, इटलीच्या बेरेटेनीने 5533 गुणांसह आठवे, स्वीसच्या रॉजर फेडररने 4125 गुणांसह नववे आणि कॅनडाच्या शेपोव्हॅलोव्हने 3580 गुणांसह दहावे स्थान पटकाविले आहे.