वृत्तसंस्था/ टय़ूरीन (इटली)
एटीपी टूरवरील तसेच एटीपी चॅलेंजर टूरवरील 2023 च्या टेनिस हंगामासाठी विविध स्पर्धांसाठी बक्षीसांच्या रकमेत विक्रमी वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
एटीपी टूर आणि एटीपी चॅलेंजर टूरवरील विविध स्पर्धांसाठी पुढील वर्षीच्या टेनिस हंगामासाठी 217.9 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स रकमेची विक्रमी वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता एटीपी टूरवरील स्पर्धांमध्ये तसेच तीन एटीपी मास्टर्स 1000 दर्जांच्या स्पर्धांमध्ये विजेत्या टेनिसपटूंच्या बक्षीस रकमेत भरमसाठ वाढ करण्यात आली असल्याने त्याचा लाभ टेनिसपटूंना होणार आहे. एटीपी मास्टर्स 1000 दर्जाच्या स्पर्धांसाठी कालावधी वाढविण्यात आला आहे. आत ही स्पर्धा 8 ऐवजी 12 दिवसांची राहिल. टेनिस स्पर्धेला जागतिक स्तरावर आता विशेष प्रतिष्ठा लाभली आहे. त्यामुळे या स्पर्धेत जागतिक दर्जाचेच स्पर्धक सहभागी होत असतात आणि त्यांच्या बक्षीस रकमेमध्ये वाढ होणे जरुरीचे असल्याचे एटीपीचे चेअरमन अँड्रीया गॉडेन्झी यांनी सांगितले.