नोव्हेंबरमध्ये होणार स्पर्धा
वृत्तसंस्था/ लंडन
रशियाच्या डॅनील मेदवेदेव्हने अमेरिकन ओपन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठून मोसमाच्या अखेरीस नोव्हेंबरमध्ये होणाऱया एटीपी फायनल्स स्पर्धेतील स्थान निश्चित केले असल्याचे एटीपी टूर्सने सांगितले.
या स्पर्धेसाठी जोकोविच, राफेल नदाल, डॉमिनिक थिएम यांनी याआधीच पात्रता मिळविली आहे. लंडनमधील ओ 2 येथे या स्पर्धेचे शेवटचे आयोजन होणार असून 15 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. यानंतर पुढील पाच वर्षासाठी या स्पर्धेचे आयोजन इटलीतील तुरिन येथे होणार आहे. एटीपी फायनल्स स्पर्धेची ही 50 वी आवृत्ती असून त्यात पुरुष एकेरी व दुहेरीतील आठ सर्वोत्तम खेळाडू व जोडय़ांना खेळण्याची संधी मिळते. ब्रिटन सरकारच्या मार्गदर्शक सुचीनुसार स्पर्धा होणार असल्याने ही स्पर्धाही प्रेक्षकांशिवाय खेळविली जाणार आहे. या स्पर्धेचा विद्यमान विजेता स्टीफानोस सित्सिपस व अलेक्झांडर व्हेरेव्ह पात्र होण्याच्या मार्गावर आहेत. दुहेरीत अमेरिकन ओपन चॅम्पियन मेट पॅव्हिक व ब्रुनो सोआरेस व ऑस्ट्रेलियन ओपन विजेते राजीव राम व जो सॅलिसबरी यांनी आपले स्थान निश्चित केले आहे.