कंपनीच्या कार्याकडे पाहूनच गुंतवणूक – मयांक सिंघल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अबुधाबीमधील तंत्रज्ञान आणि गुंतवणूक कंपनी एडीक्मयु यांनी ऑनलाइन शिक्षण देणारी फर्म बायजूमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. सदरची गुंतवणूक किती रकमेची झाली आहे, याबाबतचा खुलासा मात्र करण्यात आलेला नाही.
भारतातील ऑनलाईन शिक्षण प्रणाली राबवणारी फर्म बायजू देशातील आघाडीवरची सर्वात मौल्यवान स्टार्टअप कंपनी ठरली आहे. 2020 मध्ये आम्ही या कंपनीच्या संपर्कात आलो आणि या कंपनीचे कार्य पाहून खूप समाधान वाटले. त्यानंतर त्यांच्या या कार्यामध्ये आपलाही सहभाग हवा यावर जोर दिला. कंपनीने सदरच्या बायजूमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असल्याचे एडीक्मयुचे मुख्य मयांक सिंघल यांनी म्हटले आहे. बायजुने अलीकडेच 350 दशलक्ष डॉलर्स रक्कम उभारली असून यामध्ये ‘एडीक्यु’ कंपनीचा वाटा असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान एडीक्मयुने नेमकी किती गुंतवणूक केली आहे, याचा खुलासा मात्र करण्यात आलेला नाही. अबुधाबीमधील तिसरी मोठी गुंतवणूक कंपनी म्हणून एडीक्युचा उल्लेख होतो. गेल्या वर्षभरामध्ये एडीक्यु कंपनीने अनेक करार केले असल्याचे दिसून आले आहे. विमानतळांची मालकीही या कंपनीकडे असून खाद्य व कृषी व्यवसायामध्येही कंपनीने आपला विस्तार केला आहे.