भारतीय सेवांमध्ये सुधारणांसाठी सहाय्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आशियाई विकास बँक (एडीबी) यांच्याकडून भारतात शहरांमधील सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी जवळपास 35 कोटी डॉलरचे कर्ज देण्यात येणार असल्याची माहिती आहे. बहुपक्षीय एजन्सीजकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार एडीबीकडून आवास आणि शहर संदर्भात माहिती व सल्ल्यासंबंधी सहाय्य करण्यात येणार आहे.
यासोबतच आशिया विकास बँक नियमावलीतही सुधारणा करण्यासाठी गुंतवणुकीची योजना तयार करत आहे. राज्यांमध्ये शहरांसाठी स्थानिक बदलांसाठी प्रोत्साहन देत बदल करण्यावर भर देणार आहे. अर्थ मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव रजत कुमार मिश्रा यांनी शहरी विकास व सेवा वितरणदरम्यान 35 कोटी डॉलरच्या कर्जासाठीच्या करारावर सही केली आहे.